मुंबई। राज्यात परतणाऱ्या परराज्यातील श्रमिक आणि कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.राज्यातील कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची आज (७ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली आहे. तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले, यापुढे लॉकडाऊन करतांना आगाऊ सुचना द्यावी, त्यांनी सरकारला सांगितले.
परप्रांतीय कामगार आज ना उद्या परत येतील तेव्हा त्यांच्या तपासणीची व्यवस्था करावी लागेल. आता परत राज्यात परतणाऱ्या परराज्यातील श्रमिक आणि कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी, असे राज ठाकरेंनी सरकारला सूचविले आहे.
कोरोना विषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून आणि इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यांतून सहभागी झाले होते.
राज ठाकरेंनी सरकारला दिल्या या सूचना
- कंटेनमेंट झोन्सच्या ठिकाणी पोलीस बळ वाढवावे लागेल.
- पोलीस थकले आहेत. त्यामुळे एसआरपी फौज आवश्यक आहे.
- पोलिसांना लोकही गृहीत धरताहेत.
- अनेक ठिकाणी छोटे दवाखाने बंद आहेत, रुग्णांचे हाल होत आहेत.
- ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तरुण अडकेल आहेत त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था व्हावी.
- परप्रांतीय कामगार आज ना उद्या परत येतील तेव्हा त्यांच्या तपासणीची व्यवस्था करावी लागेल. आता परत राज्यात परतणाऱ्या परराज्यातील श्रमिक आणि कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी
- यापुढे लॉकडाऊन करतांना आगाऊ सुचना द्यावी