पुणे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील प्रचार सभा रद्द झाली आहे. पुण्यातील काल (९ ऑक्टोंबर) सभेच्या संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने राज ठाकरेंची पहिलीच प्रचारसभा होण्याआधीच रद्द करावी लागली. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि आकाशातून कोसळणाऱ्या जलधारांमुळे मैदानात सर्वत्र चिखल झाला होता. त्यामुळे सभा घेणे शक्य नसल्याने अखेर वेळेवर सभा रद्द करावी लागली. या सभेद्वारे राज ठाकरे पक्षाच्या प्रचाराचा नारळ फुटणार होता. या सभेत राज ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पुण्यातील सभेसाठी राज ठाकरे यांना मैदान मिळत नव्हते. मात्र,खूप प्रयत्नानंतर त्यांना सरस्वती मंदिर शाळेचे मैदान मिळाले होते. या सभेवर परतीच्या पावसामुळे ही सभा रद्द करण्यात आली. सभा रद्द झाल्यामुळे पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. मनसेचे एकमेव स्टार प्रचारक राज ठाकरे पुण्यात सरकारवर तोफ डागार होते. कसबा गणपतीचे दर्शन घेऊन राज ठाकरे भाषण करणार होती.
मनसेचे अजय शिंदे यांच्यासाठी पुण्यातील कसब्यात ही सभा होणार होती. भाजपच्या मुक्ता टिळक यांना त्यांनी आव्हान दिले होते. या मतदारसंघात शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली तर काँग्रेसचे अरविंद शिंदे ही मैदानात आहेत. गिरीश बापट खासदार होऊन दिल्लीत गेल्याने भाजपने महापौर मुक्ता टिळक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी राज यांच्या या सभेकची कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहात होते. मात्र त्यांचा हिरमोड झाला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.