HW News Marathi
महाराष्ट्र

महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे कंबर कसून तयार!

नाशिक | महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसलेली आहे हे दिसून येतंय. मनसे नेते अमित राज ठाकरे आज(२८ जुलै) नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.

बॅग भरून येण्याचं आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल(२७ जुलै) ठाण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. नाशिक आणि पुणे पाठोपात मनसे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे.या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मुख्य अजेंडा ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत मोठे फेरबदल होण्याचे संकेतही दिले जात आहेत. दरम्यान, ठाण्यात मनसेचा सध्या एकही नगरसेवक नाही. अशावेळी ठाणे महापालिकेसाठी होणारी मनसेची ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

राज ठाकरे आता पुणे दौऱ्यावर

राज्यात आता निवडूकीचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे सगळेच पक्ष आपल्या पक्षाला उभारी आणि बळकट करण्याचं काम करत आहेत. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सध्या राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. मात्र, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १९ ते २१ जुलै असे तीन दिवस पुणे दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात आजीमाजी पदाधिकाऱ्यांशी राज संवाद उपक्रमा अंतर्गत राज ठाकरे हे संवाद साधणार आहेत. अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बाबू वागसकर म्हणाले की, पुणे शहराच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर राज ठाकरे येत असून राज संवाद उपक्रमा अंतर्गत, सोमवारी १९ जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघाची सेनापती बापट रोडवरील, इंद्रप्रस्थ कार्यालय येथे बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ वेळेत कोथरूड आणि खडकवासला माणिक बाग पेट्रोल पंपा समोरील, परिणय मंगल कार्यालयात होणार आहे. तर दुसर्‍या दिवशी मंगळवारी २० जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत हडपसर आणि कॅन्टोन्मेंट विभागाची कोंढवा खुर्द येथील लोणकर लान्स येथे बैठक होणार असून, १ ते ४ दरम्यान कसबा आणि पर्वती विभागाची बिबवेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तर आम्ही इथली शासनकर्ती जमात होऊ! – गोपीचंद पडळकर

Aprna

“शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने परत सुरु करावे”, मुख्यमंत्र्यांची मागणी

Aprna

बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

News Desk