HW News Marathi
महाराष्ट्र

सुरक्षा कमी करण्याचा  निर्णय हा सरकारचे “खुजेपण” दाखवणारा – मनसे 

मुंबई | ठाकरे सरकारने राजकीय नेत्यांना दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत अनेक नेत्यांची सुरक्षा यंत्रणा कमी केली आहे. यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यामुळेच मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी ठाकरे सरकारवर हल्ला केला आहे. ‘ये पब्लिक सब जानती है’ म्हणत नांदगावकरांनी राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढल्याचा सरकारचा निर्णय खुजेपणाचा असल्याची टीका केली.

बाळा नांदगावकर यांनी याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे, “सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यात राजसाहेब यांचेही नाव आले. सरकार कोणाचेही असो वास्तवाचे भान ठेऊन असे निर्णय घ्यायला हवे. राज्यातील जनतेसाठी सतत उपलब्ध असणारा नेता, स्वतःच्या पक्षाचा फायदा नुकसान याचा विचार न करता स्पष्ट भूमिका घेणारा नेता, सामान्य लोकांच्या भल्यासाठी अनेकांशी भिडणारा नेता म्हणून राजसाहेब पूर्ण राज्याला माहिती आहेत.”

“राज ठाकरे यांच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू त्यांच्याबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु त्यांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही. त्यांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत. सरकार दरबारी जी कामे होत नाही किंवा ज्या विषयांना मतपेटीसाठी टाळले जाते असे अनेक विषय राज दरबारी निकालात निघतात. त्यांच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तर पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे “खुजेपण” ठळकपणे दाखविणारा आहे,” असंही नांदगावकरांनी नमूद केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं संकट; पुण्यासह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

News Desk

‘धोकादायक गावांचं होणार पुनर्वसन,’ पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची माहीती..!

News Desk

पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंनी काँग्रेस महासचिवांना निलंबित केलं!

News Desk