HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास सुरू

मुंबई | मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकलने  प्रवास करणार आहे. मनसे सविनय कायदेभंग आंदोलन करत आज (२१ सप्टेंबर) मुंबईकरांसाठी लोकलमधून प्रवास करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी स्टेशन बाहेरच अडवले. तर दुसरीकडे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लोकल प्रवास सुरू केला आहे.

“नोटीस आली तरी आंदोलन हे केलं जाणार, मुंबईत शिवसेनेचा आंदोलनाला परवानगी मिळते. मग मनसेच्या आंदोलनाला नोटीस का? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. आमचं आंदोलन हे सर्वसामान्यांसाठी आहे, गेले अनेक दिवस लोकल सेवा बंद आहे. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. मनसेचे आंदोलन हे होणारच, कंगना विरोधातील आंदोलनाला शिवसेना परवानगी फक्त मनसेच्या आंदोलनाला नोटीस दिली जाते”, असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

Related posts

शांत राहूनही चांगले काम करता येते, त्यासाठी घसा फोडण्याची गरज नसते

News Desk

हेमंत करकरे यांनी एटीएस प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल सुमित्रा महाजन यांना शंका

News Desk

महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन, सरकारकडून नवे नियम जारी

News Desk