HW News Marathi
Covid-19

मोदी सरकारने मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्या

मुंबई | देशात कोरोनाचा कहर हा वाढत चालला आहे महाराष्ट्रात मुंबईमध्ये सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत या रुग्णांवर रात्रंदिवस डॉक्टर नर्स आरोग्य सेवेतील इतर कर्मचारी अथक परिश्रम घेऊन या रुग्णावर उपचार करत आहेत मात्र मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काम करत असणाऱ्या या सर्वांना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे याबद्दलचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.
मोदी सरकारने मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किंवा दूर राहतात ते लोकलशिवाय कामावर रुजू होऊ शकत नाहीत, त्यामुळे रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही. त्यांच्यासाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्या, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे मुख्यमंत्री चांगले आहेत, पण… !

News Desk

मुख्यमंत्र्यांची राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसमवेत बैठक

News Desk

राज्यातील कंन्टेटंमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी

News Desk