HW News Marathi
Covid-19

मोहरमसाठी नियमावली जाहीर…. जाणून घ्या नियम

मुंबई | कोरोनाचा हा कहर अजूनही सुरु असून याचा फटका या काळात साजरा केल्या जाणाऱ्या सर्वच धर्मातील सण,उत्सवांना बसला आहे. बकरी ईद, दहीहंडी यांच्यानंतर आता जवळ आलेल्या गणेशोत्सव व मोहरमवर देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने शासनाने घातलेल्या निर्बंधातच हे सण, उत्सव साजरा करणे बंधनकारक आहे.

दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी याआधीच नियमावली जाहीर करत शासनाने यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मोहरम देखील साध्या पद्धतीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने सार्वजनिक मातम मिरवणुकीला परवानगी देता येणार नाही, अशी सुचना देखील करण्यात आली आहे.

काय आहेत सूचना ?

१- मातम मिरवणूक- कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे मोहरम देखील आपापल्या घरात राहून दुखवटा पाळण्यात यावा, केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम/दुखवटा करु नये.

२) वाझ/मजलीस- हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावे.

३) ताजिया/आलम- ताजिया/आलम काढण्यास परवानगी देता येणार नाही. ताजिया/आलम घरीच/घराशेजारी बसवून तेथेच शांत/ विसर्जन करण्यात यावेत.

४) सबील/छबील- सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. सदर ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात यावे.

५)कोणत्याही कार्यक्रमात चारपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी राहणार नाही.

६) कोविड- 19च्या परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबीरे, प्लाज्मा शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबविण्यात यावेत व या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

News Desk

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून टाक्स फोर्स नियुक्त करा,आशिष शेलारांची मागणी

News Desk

‘दिशा कायदा‘ ही केवळ घोषणाचं होती का ? चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांना सवाल!

News Desk