मुंबई। अर्धा जून महिना संपला तरी अजून मान्सूनचा पत्ता नाही. संपूर्ण देश चातकासारखी पावसाची वाट पाहात आहे. महाराष्ट्रातही दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र होत चालल्या आहे. अशातच पाऊस येणार या आशेन बळीराजाचेही डोळे आभाळाकडे लागलेले आहे. मात्र आता ही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याची माहीती आहे. हवामान विभागाचे विशेषज्ञ के.एस होसाळीकर यांनी मान्सूनबाबत माहीती दीली आहे त्यांनी एक ट्विट केल आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलय की, कोल्हापूर, रत्नागीरी, शिमगाव, सालेम, कडलोर या ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे. उर्वरीत महाराष्ट्रातही २ ते ३ दीवसात मान्सूनचे आगमन होणार असल्याचे त्यांनी सांगितल आहे.
Monsoon onset declared in parts of south Konkan and parts of south Madhya Maharashtra today.
The monsoon northern limit is passing from 17 N, Ratnagiri, Kolhapur, Shimoga, Salem, Cuddalore,.. Gangtok
Conditions are favourable for some more parts of Maharashtra in next 2,3 days.— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 20, 2019
तर भारतीय हवामान विभागाने पुढच्या १० दिवसांचा अंदाज वर्तवताना महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मात्र सध्याची हवामानाची निरीक्षणे पाहिली तर ती पावसासाठी अनुकुल नसल्याचे दिसते आहे.आयएमडीसह अनेक मॉडेलचे महिनाभराचे अंदाज पाहिले तर पुढच्या २० दिवसात मोठ्या पावसाची अपेक्षा नासल्याची माहीती आहे. वायू चक्रीवादळामुळे अरबी समुद्रावर जमा झालेले बहुतांश बाष्प निघून गेला आहे.
मॉन्सूनचे नैऋत्य मोसमी वारे समुद्र सपाटीपासून साधारणपणे सहा किलोमीटर पर्यंतच्या उंचीवर प्रवाहीत असतात. सध्या त्यांची उंची समुद्र सपाटीपासून फक्त दीड किलोमीटरपर्यंतच असल्याचे दिसते आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वर वातावरणात सहा किलोमीटर उंचीवर पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह वाहू लागतो. सध्या हा प्रवाह दहा किलोमीटर उंचीवर आहे. थोडक्यात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक आदर्श स्थिती तयार झालेली नाही. तर होसाळीकर यांनी दीलेल्या माहीतीनुसार महाराष्ट्रात ३ दिवसात मान्सून येणार असल्याचे समजते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.