HW News Marathi
Covid-19

यंदा १ जूनलाच मान्सून केरळमध्ये होणार दाखल, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई | भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ जूनला नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. गुरुवारी बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे़. मालदिव-कोमोरिन क्षेत्रात मॉन्सूनच्या आगमनाच्या दृष्टीने वातावरण असून असल्याने येत्या ४८ तासात या भागातही मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, “नैऋत्य मान्सून १ जूनला केरळमध्ये दाखल होण्यासाठी हवामान अनुकूल आहे. ३१ मेला दक्षिण पूर्व आणि पूर्वेकडील मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज आहे.”

अरबी समुद्रातील पूर्व मध्य अरब समुद्राच्या भागात येत्या ४८ तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, “४ जूननंतर त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ दक्षिण ओमान आणि पूर्व येमन देशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे”. याच पार्श्वभूमीवर, या काळात मच्छीमारांनी पश्चिम अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यापूर्वी, खरंतर हवामान विभागाने यंदा भारतात मान्सून उशिरा दाखल होईल असे सांगितले होते. केरळमध्ये ५ मेपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज याआधी व्यक्त करण्यात आला होता. मात्र, नव्या अंदाजानुसार केरळमध्ये यंदा मान्सून १ जूनलाच दाखल होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशोक चव्हाणांनी आपल्या औकातीत राहावं ! चंद्रकांत पाटलांची टोकाची टीका

News Desk

परळी वैजनाथ येथील महाशिवरात्र यात्रा उत्सव रद्द करीत असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचे आदेश…

News Desk

‘MPSC परीक्षा रद्द होऊ नयेत’ हे माझं वैयक्तिक मत होतं, मात्र…! भुजबळांची नाराजी ?

News Desk