उल्हासनगर(गौतम वाघ):- मातोश्री सावित्रीबाई फुले सामाजिक सस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती व कर्करोग जनजागृती करण्यासाठी मँरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
मातोश्री सावित्रीबाई फुले सामाजिक संस्था ही गेल्या तेरा वर्षोपासुन कार्यरत असुन सस्थेचे जवळपास ३५०ते ४०० सदस्य ठाणे जिल्ह्यात काम करत आहे. एम.एस.पी .कँन्सर केअर , एन. जी.ओ.संस्था प्रामुख्याने व्यसनमुक्ती आणि कर्करोग जनजागृती यावर काम करते.याचाच एक भाग म्हणून सस्थेकडुन उल्हासनगर शहरामध्ये मँरेथॉनचे नियोजन ५/११/२०१७ रोजी रविवारी करण्यात आले आहे. या मँरेथॉन स्पर्धेत साधारणतः १५०० ते २००० धावपटू भाग घेणार आहे. ही स्पर्धा ५ आणि १० किलोमीटर असुन १७ वयोगटाचा आतील आणि १८ते ४५ वयोगट या प्रमाणे असेल. या मँरेथॉनची सुरुवात सकाळी सहा वाजे पासून गोलमैदान निरंकारी हॉल ते कैलाश कॉलनी , उल्हासनगर ५ येथून परत उल्हासनगर १ असा असेल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मनपा आयुक्त राजेंद्र निबांळकर , महापौर मिना आयलानी.,विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे , शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी., सभागृह नेता जमनू पुरस्वानी आदी मान्यवर उपस्थित असणार असल्याची माहिती सस्थेचे अध्यक्ष विशाल मोरे., उपाध्यक्ष नारायण वाघ , सुनील पाटील , संतोष गायकवाड यांनी पत्रकारांना माहिती दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.