HW News Marathi
महाराष्ट्र

”महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत भाजपला भुईसपाट करुन देईल”, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर उदय सामंतांची टीका!

मुंबई। शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही भाजपच्या कार्यक्रमाला आलोय. यांना वाटतंय की शिवसेना भवन तोडायला आले की काय? जर अंगावर आले तर शिवसेना भवन ही तोडू असं थेट वक्तव्य भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं. ही तर भाजपच्या पुढाऱ्यांची राजकीय विचारांची दिवाळखोरी असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

शिवसेना भवन फोडू असे वक्तव्य केल्यावर सामंतांची प्रतिकिया

शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत यांना भुईसपाट करून देईल. वंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडू असे वक्तव्य केले त्यावर सामंत या प्रतिकिया दिली आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड काय म्हणाले?

भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमासाठी प्रसाद लाड माहिममध्ये आले होते. गेल्या महिन्यात शिवसेना भवनावर माहिम येथील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होतं. कार्यकर्त्यांशी बोलत असताना वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांच्या मुलाला ED कडून समन्स

Aprna

‘शरद पवार यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या’; मेट्रोच्या ट्रायलवर भाजपची टीका

News Desk

तीन पक्षांच्या सरकारवर टीका करणाऱ्यांना रोहित पवारांनी थेट रिक्षाच चालवून दाखवली

News Desk