मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात सुद्धा धाव घेतली होती. परमबीर सिंगी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज (२४ मार्च) सुनावणी होणार होती. होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या याचिकेकडे सर्वांचं लक्ष लागले होते. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, परमबीर सिंग यांनी जे आरोप केले आहेत ते अतिशय गंभीर आहेत. पण परमबीर यांनी अनिल देशमुख यांना प्रतिवादी का केलं नाही असा सवाल उपस्थित करत सुर्पीम कोर्टाने परमबीर सिंग यांना हाय कोर्टात जाण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सिंग यांची याचिका उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली आहे. या याचिकेवर आता उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पुढे सुप्रीम कोर्टाने असं ही म्हटलं आहे की, माजी पोलिस आयु्क्त परमबीर सिंग यांनी मुख्य याचिका ही त्यांची बदली थांबवण्यासाठी केली आहे. मात्र, त्यांचे आरोप जर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आहेत तर त्यांना प्रतिवादी का केलं नाही असा सवाल विचारत सुप्रीम कोर्टाने परमबीर यांना फटकारलं आहे. त्यामुळे वकील मुकूल रोहतगी यांना त्यांनी असं सांगितलं आहे की, ही याचिका उच्च न्यायालयात द्यावी. आणि हायकोर्टाने त्यावर लवकर सुनावणी करवी असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्यानुसार वकील मुकूल रोहतगी यांनी सांगितलं आहे की, आजचं उच्च न्यायालायात याचिका सादर करणार आहे.
Supreme Court refuses to entertain the plea of former Mumbai Police chief Param Bir Singh seeking CBI investigation in the alleged corrupt malpractices of Anil Deshmukh, Home Minister of Government of Maharashtra and asks him to approach the High Court.
— ANI (@ANI) March 24, 2021
परमबीर सिंह यांच्या प्रमुख मागण्या
- मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची आणि खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात कशाप्रकारे आपल्यावर दबाव आणण्यात आला याची सीबीआय चौकशी व्हावी.
- मुंबई पोलीस आयुक्त पदावरून आपली बदली करण्यात आली ती बेकायदेशीर आहे. ती बदली रद्द करावी.
- गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या भ्रष्ट वर्तणुकी’ची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी
- तसेच राज्य सरकारने आपल्यावर काही कारवाई केली तर त्या कारवाईपासून आपल्याला संरक्षण मिळावं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.