HW News Marathi
महाराष्ट्र

आतापर्यंत १० हजारांपेक्षा जास्त ST कर्मचाऱ्यांचे निलंबन; आता बडतर्फ करण्याचा परबांचा इशारा

मुंबई | एसटी कर्मचारी अद्यापही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता पर्यंत १० हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असून ते कर्मचाऱ्यांना बडतर्फी देखील करण्यात येऊ शकते, अशा इशाराही राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. परबांनी आज (१६ डिसेंबर) प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. कर्मचाऱ्यावर मस्मा लावण्याबाबत उद्या (१७ डिसेंबर) बैठक होणार आहे.

अडीच हजारापेक्षा अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. परबांना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात सदावर्ते यांचे नाही तर यात कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे, असेही ते म्हणाले. परब हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा त्यांच्यावर रोष पाहात त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

२२ हजार एसटी कर्मचारी कामावर परतले

राज्यात आतापर्यंत २२ हजार कर्मचारी कामावर परत आले असून एसटीच्या १२५ डेपोत वाहतूक पूर्णपणे सुरू आहे. यात पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील बरेच डेपो सुरू झाले आहेत. तर विदर्भ मराठवाड्यात कमी अधिक प्रमाणात वाहतूक सुरू आहे. यावेळी परबांनी ओबीसी आरक्षणावर प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “कोर्टाने इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी न्यायालयात सादर करावा. तोर्यंत स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलव्यात, अशी ठराव काल (१६ डिसेंबर) कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Teachers Day | शिक्षक दिनी ज्ञानदाते रस्त्यावर

News Desk

अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले त्या माणसाबद्दल बोलायला नको, निलेश राणेंचा प्रहार

News Desk

पंढरपुरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकरांना पोलिसांकडून अटक

News Desk