HW News Marathi
Covid-19

आकडा वाढला ! राज्यात आज तब्बल १३ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित

मुंबई । कोरोनाच्या पुन्हा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे राज्यातील प्रमुख शहरांवर लॉकडाऊनचे सावट असताना आता राज्य सरकारच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे. राज्यात आज (10 मार्च) तब्बल 13 हजार 659 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा गेल्या अनेक आठवड्यांमधील मोठा आकडा असल्याने शासन-प्रशासनासह नागरिकांनी अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही आकडेवारी जारी केली आहे.

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिलासादायक बाब अशी की, राज्यात गेल्या २४ तासांत नवीन 9 हजार 913 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण 20 लाख 99 हजार 207 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण 99 हजार 008 कोरोनारुग्ण ऍक्टिव्ह आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21% झाले आहे. दरम्यान, राज्य सरकार या संदर्भात कोणती कठोर पावले उचलणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण विधानसभेच्या अध्यक्ष पदाची ऑफर स्वीकारणार का?

News Desk

महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे का ? संजय राऊत म्हणतात

News Desk

मंत्रालयात आणखी एका आणखी एका प्रधान सचिवांना कोरोनाबाधित

News Desk