HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज्यात आज २३ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’ तर रिकव्हरी रेट ८७.५१ %

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून आज (२१ ऑक्टोबर) एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, “राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात तब्बल २३ हजार ३७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सातत्याने वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा पाहता राज्यात कोरोनास्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत तब्बल १४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण १ लाख ५८ हजार ८५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान आणखी एक चांगली बाब म्हणजे सातत्याने राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट वाढत असून सध्या महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५१% इतके झाले आहे.

Related posts

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात न जाण्यासाठी रवी राणा आंदोलन करणार

News Desk

खुशखबर ! ॲाक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला मिळाली परवानगी !

News Desk

धक्कादायक ! बीड जिल्ह्यात आज ७ जण कोरोना पॉझिटिव्ह 

News Desk