HW News Marathi
महाराष्ट्र

आरोग्य विभागात २५ हजारांहून अधिक रिक्त पदे भरणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक १०, पुण्यात ५ नागपूर ३, अहमदनगर २, सांगली, जळगाव आणि बुलजाणा प्रत्येकी १ रुग्णांची भर पडली आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २१५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आरोग्य विभागात २५ हजारांहून अधिक पदे भरणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलोताना म्हणाले. या भरती प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेषाधिकार देण्यात आला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात सध्या कोरोनाचे संकट ओढवले असून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्या २४ तास काम करत आहेत. राज्यातील आरोग्यविभागावर सध्या सर्वा जास्त ताण आहे. आरोग्य विभागात गेल्या अनेक वर्षापासून रिक्त पदे आहेत. विधानसभेच्या आधिवेशनादरम्या देखील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर आरोग्यविभागातील रक्क पदे भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, या भरतीदरम्यान कुठेही गर्दी आणि रांग नसणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना विशेषाधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार ही भरती होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपल्याच वहिनीवरती अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं होतं? नाव न घेता राणेंचा खळबळजनक आरोप

News Desk

एखाद्या विषयावर मतभेद असू शकतात पण महाविकासआघाडीत नाराजी नाही, राऊतांचं स्पष्टीकरण

News Desk

रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारणार! – राजीव चंद्रशेखर

Aprna