HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमधील स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सुदाम मुंडे यांचा जामीन अर्ज फेटाळला 

बीड | बीडमधील स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सुदाम मुंडे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. अंबाजोगाई न्यायालयाने सुदाम मुंडेचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.अनधिकृतपणे रुग्णालय सुरु केल्यावरुन सुदाम मुंडेला पुन्हा अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असून तत्पूर्वी डॉ. सुदाम मुंडे याने जामीन मिळावा यासाठी विनंती अर्ज केला होता. दरम्यान अंबाजोगाई न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे.

डॉ. सुदाम मुंडे याने शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा बेकायदेशीरपणे वैद्यकीय प्रॅक्टिस सुरु केल्याचे गेल्या महिन्यात समोर आले होते. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने 6 सप्टेंबरला पहाटे परळीतील मुंडे हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा टाकला होता. यात हॉस्पिटलमधील साहित्य जप्त करण्यात आले होते. तसेच, पोलिसांनी सुदाम मुंडेला पुन्हा अटक केली. तो डॉक्टर असलेल्या मुलीच्या नावाने स्वतः प्रॅक्टिस करत होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बीड जिल्ह्यातील परळी इथल्या डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये 18 मे 2012 रोजी विजयमाला महादेव पटेकर या महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र दोघेही फरार झाले होते. यानंतर परळी न्यायालयाने दोघांनाही 3 जुलैपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. अन्यथा सीआरपीसी कायदा 83 नुसार संपत्ती जप्तीची कारवाईचा इशारा दिला होता.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमचा रद्द केला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी या दाम्पत्याला जामीन मंजूर झाला होता. मात्र सामाजिक संघटनांनी आंदोलनं करुन जामीन रद्द करण्याची मागणी केली.

यानंतर मुंडे दाम्पत्य स्वत: पोलिसात हजर झालं होतं. त्यांच्यावर खटला चालल्यानंतर 2015 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्यांना 4 वर्षे कैद आणि 80 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हा खटला जिल्हा न्यायालयात सुरु होता. जिल्हा सत्र न्यायालयाने मुंडे दाम्पत्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोतांचा पवारांना सवाल!

News Desk

राज्यसेवा परीक्षा आणि सर्व भर्ती प्रक्रिया पुढे ढकलण्याची संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विनंती

News Desk

शिवसेना आमदारांची बैठक संपली, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार

News Desk