HW News Marathi
Covid-19

३०० हून अधिक कोरोनाग्रस्त महिलांच्या प्रसुती, नायर रुग्णालयाने दिलेले योगदान अतुलनीय !

मुंबई | महापालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोनाबाधित मातांच्या सुखरुप प्रसूती करण्याचा ३०० चा टप्पा काल (१४ जून) रात्री पार केला आहे. तर नायर रुग्णालयाने आज (१५ जून) सकाळी दोन महिलांच्या सुखरुप प्रसूती करत एकूण संख्या आता ३०६ वर गेली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट नायर रुग्णलयाचे कौतुक केले आहे. “आतापर्यंत कोरोनाग्रस्त ३०० महिलांच्या प्रसुती येथे पार पडल्या. कोरोनाच्या विरोधातील लढ्यात आपले योगदान अतुलनिय आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुंबईतील नायर हॉस्पिटल १८ मार्च रोजी कोविड-१९ ग्रस्त रुग्णांसाठीचे विशेष हॉस्पिटल म्हणून जाहिर झाले. हे १०४७ खाटांचे रुग्णालय असून कोविड-१९ ग्रस्त रुग्णांसाठी निदान, उपचार आणि काळजी यांची उत्तम सोय येथे आहे.आतापर्यंत कोरोनाग्रस्त ३०० महिलांच्या प्रसुती येथे पार पडल्या.” “ही सर्व व्यवस्था व जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडणारे नायर हॉस्पिटलचे डीन डॉ. मोहन जोशी, डॉ. सारिका पाटील, डॉ. राठी आणि इतर सहकारी यांचे आभार. कोरोनाच्या विरोधातील लढ्यात आपले योगदान अतुलनिय आहे,” असे ट्वीट करत सुप्रिया सुळेंनी नायर रुग्णालयातील सर्वांचे कौतुक केले आहे.

दरम्यान, नायर रुग्णालयातमध्ये १४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाबाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. यानंतर तब्बल २ महिन्यात नायर रुग्णालयात ३०० हून अधिक कोरोनाग्रस्त महिलांच्या सुखरुप प्रसूती केल्या आहेत. प्रसूती झालेल्या ३०२ मातांपैकी २५४ मातांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोविडचा संसर्ग हा जन्मत: होत नाही, अशी महिती रुग्णालयाकडून मिळाली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत ८३,८०९ नवे रुग्ण आढळले

News Desk

कोरोनाकाळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी!

News Desk

मराठा आरक्षणावरची पुढची सुनावणी आता थेट १ सप्टेंबरला होणार

News Desk