HW News Marathi
Uncategorized

अभिनेता सुशांतच्या पार्थिवावर दुपारी ३ वाजता मुंबईत होणार अंत्यसंकार

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे रविवारी (१४ जून) दुपारी आत्महत्येच्या कारणाने निधन झाले आहे. मुंबई पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही घटना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी घडली. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. सुशांतच्या निधनाच्या या वृत्तानंतर सुशांतच्या बॉलिवूडसह चाहत्यांपासून अगदी सर्व क्षेत्रातील दिग्गजांकडून शोक व्यक्त केला गेला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या पार्थिवावर आज (१५ जून) दुपारी ३ वाजता मुंबईतील समशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. बॉलीवूडमध्ये कोणीही गॉड फादर नसताना केवळ आणि केवळ आपल्या कलेच्या जोरावर, प्रचंड संघर्ष करून नावारूपाला आलेल्या या तरुण, दमदार अभिनेत्याचा चाहता वर्गही फार मोठा आहे. त्याच्या जाण्याने निश्चितच या सर्वांना मोठा धक्का बसला.

सुशांत सिंह राजपूतचा टीव्ही सीरिअल ते बॉलीवूड हा प्रवास अत्यंत रोमहर्षक ठरला. सुशांतच्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरिअल ‘किस देश मे हा मेरा दिल’ मधून झाली. त्यानंतर त्याला खरी लोकप्रियता दिग्दर्शक एकता कपूर यांच्या ‘पवित्र रिश्ता’ या सिरिअलमधून मिळाली. त्यातील अभिनयाच्या जोरावर सुशांतचे बॉलीवूडमध्ये पदार्पण झाले. ‘काय पो छे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील सुशांतच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘केदारनाथ’, ‘पीके’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये सुशांतने आपल्या अभिनयाची ताकद दाखवली. ‘एम. एस. धोनी दि अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारताच्या लोकप्रिय क्रिकेटपटू एम. एस. धोनीचा संघर्ष त्याने पडद्यावर दाखवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana | दावा केलेले लाभार्थी एच डब्ल्यूवर

Atul Chavan

“महाराष्ट्राचे हिंदुहृदयसम्राट फक्त बाळासाहेब ठाकरे” – Deepak Kesarkar

News Desk

प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

News Desk