मुंबई । महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची गेल्या २४ तासांतील आकडेवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यात आज (१२ डिसेंबर) ४ हजार २५९ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब अशी की याच २४ तासांत ३ हजार ९४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आज 4259 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3949 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1753922 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 73542 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.46% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 12, 2020
राज्यासाठी दिलासादायक बाब अशी की, राज्यात आतापर्यंत तब्बल १७ लाख ५३ हजार ९२२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ७३ हजार ५४२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.४६% झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.