HW News Marathi
महाराष्ट्र

उन्हाळ्यात गोवा-कोकणात जाणार रेल्वेच्या जादा गाड्या

मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकण आणि गोव्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण जादा गाड्या सोडल्या आहेत. या तिन्ही एक्स्प्रेस सुपरफास्ट असून, त्या सीएसएमटी, पनवेल ते करमाळीपर्यंत धावणार आहेत.

सीएसएमटीहून गाडी क्र. ०११२७ ही बुधवार, ९ मे रोजी रात्री १२.२० वाजता सुटून करमाळीस त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता पोहोचेल.परतीच्या मार्गावर गाडी क्र. ०११२८ ही शुक्रवारी सकाळी. १०.२० वाजता सुटून सीएसएमटी येथे रात्री ११.१५ वाजता पोहोचेल. या तिन्ही गाड्यांच्या तिकिटांसाठी अतिरिक्त दर लागू असून, ही तिकिटे ऑनलाइन वा खिडक्यांवर ७ मेपासून उपलब्ध होणार आहेत.

तीन ‘सुपरफास्ट’ एक्स्प्रेस

– सीएसएमटी, पनवेल ते करमाळीपर्यंत एक्स्प्रेस धावणार

– सीएसएमटीहून गाडी क्र. ०११२७ बुधवार, ९ मे रोजी रात्री १२.२०वाजता

करमाळीला सकाळी ११.३० वाजता पोहोचेल

– करमाळीहून गाडी क्र. ०११२८ शुक्रवार, स. १०.२० वाजता

सीएसएमटीला रात्री ११.१५ वाजता पोहोचेल

– पनवेलहून गाडी क्र. ०११२९ बुधवार, ९ मे रोजी रा. ११.४० वाजता

सकाळी ९ वाजता करमाळीला पोहोचेल

– करमाळीहून गाडी क्र. ०११३० बुधवार, ९ मे रोजी दु. २ वाजता

रात्री ११.४० वाजता पनवेलला पोहोचेल

– पनवेलहून गाडी क्र. ०११३१ गुरुवार, १० मे रोजी रा. ११.४० वाजता

करमाळीला सकाळी ९ वाजता पोहोचेल

– करमाळीहून गाडी क्र. ०११३२ गाडी गुरुवार, १० मे रोजी दु. १.४०वाजता

पनवेलला रात्री १०.१५ वाजता पोहोचेल

– तिकिटे ऑनलाईन आणि खिडक्यांवर ७ मेपासून उपलब्ध
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार, राज ठाकरेंना निमंत्रण नाही?

News Desk

भीमा कोरेगाव : संबंधित पुरावे कार्यकर्त्यांच्या लॅपटॉपमध्ये मुद्दाम पेरल्याचा संशय

News Desk

रुपाली ठोंबरेंनी फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी नेमक्या काय म्हणाल्या…

Aprna