श्री लंका | भारतीय क्रिकेट संघात अजून दिन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. युझवेन्द्र चहल आणि कृष्णप्पा गौथम या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. मालिकेतील दोन टी-20 सामने शिल्लक असताना भारतातील कृणालसह 7 आणखी खेळाडूंना सुरक्षेचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या विलगीकरणातील दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे.
COVID-19: Yuzvendra Chahal and K Gowtham test positive in Sri Lanka
Read @ANI Story | https://t.co/1wL0NKVvEF#YuzvendraChahal #KGowtham #Cricket pic.twitter.com/vqmUKzYA67
— ANI Digital (@ani_digital) July 30, 2021
दोघांना हि वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरण
कृणाल पंड्या मागच्या आठवड्यात पॉसिटीव्ह झाला होता. कृणालला मंगळवारी कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या निकट संपर्कातील खेळाडूंची कोरोना टेस्ट केली जात होती. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी झालेल्या कोरोना टेस्टमध्ये चहल आणि गौथम दोघेही कोरोना निगेटिव्ह आढळले होते. त्यानंतर आज (30 जूलै) करण्यात आलेल्या टेस्टमध्ये दोघांच्या टेस्टही कोरोना पॉजिटिव्ह आल्या आहेत.
कृणाल पांड्या कोरोना पॉसिटीव्ह
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना एका दिवसानी पुढे ढकलण्यात आला आहे. कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. दोन्ही संघ काल दुसऱ्या टी-२० सामन्यात आमनेसामने येणार असते मात्र कोरोनामुळे सामना पुढे ढकलला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.