HW News Marathi
Covid-19

पुण्यातील ब्राह्मण महासंघाकडून चिनी वस्तू न वापरण्याची घेतली शपथ

पुणे | देशात कोरोना व्हायरस हा चीनमुळे संपूर्ण जगभरात पसरला गेला. चीन आणि भारताच्या सीमेवर तणाव वाढला आहे. यामुळे देशात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज (८ जून) पुण्यात ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आज पुण्यात चीनी मालाची होळी केली आहे. महासंघाच्या कार्यकर्त्यांनी चिनी मोबाईल रस्त्यावर फोडले. आणि ब्राहमण महासंघाचे चिनी वस्तूविरोधात आंदोलन पुकारले आहे. यावेळी चिनी वस्तू न वापरण्याची शपथ घेतली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही एक ट्विट केले आहे. राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आज पुण्यात चीनी मालाची होळी करत आहेत. वीर सावरकरांनी परदेशी मालाची होळी करण्यासाठी जी जागा निवडली तेथेच हे आंदोलन होत आहे. चीनचे आर्थिक कंबरडे मोडून काढणे हाच एक surgical strike आहे. चीनला धडा शिकवावा लागेल. वंदे मातरम!”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या बाबतीत नागरिकांचा आत्मविश्वास वाढला, भीतीत घट! मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधानाचं वक्तव्य

News Desk

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू

News Desk

जाणून घ्या…सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने दंड भरलेले ‘ते’ पंतप्रधान कोण?

News Desk