HW News Marathi
देश / विदेश

खासदार नवनीत राणा याचं जात प्रमाणपत्र अवैध, मुंबई उच्च न्यायालयाने ओढले ताशेरे

अमरावती | अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जोरदार झटका बसला असून त्यांची खासदारकी धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध आहे आणि येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रं जमा करावे असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना २ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील निकाल दिला आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्या मतदारसंघातून नवनीत राणा या निवडून आल्या होत्या. त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगितलं आहे. त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना हायकोर्टानं २ लाखांचा दंडदेखील सुनावला आहे. नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघेही सध्या दिल्लीमध्ये आहेत.

नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारी धोक्यात असल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रमाणप्रत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटं ठरलं तर संबंधित सदस्याच पद रद्द होऊ शकतं. मात्र आता नवनीत राणा यांच्याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या या निर्णयापुढे नवनीत राणा सुप्रीम कोर्टात जाणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळच्या पूरग्रस्तांना युएईनेकडून देण्यात येणारी ७०० कोटीची मदत अफवा

News Desk

मुख्यमंत्री सहायता निधीत ९३ कोटी जमा, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

News Desk

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये झाला बॉम्बस्फोट, ७० जण जखमी तर ७ जणांचा मृत्यू

News Desk