HW News Marathi
महाराष्ट्र

नवनीत राणांच्या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्तांचे ट्वीट करत दिले उत्तर

मुंबई |  मागासवर्गीय असल्यामुळे मुंबई पोलीस हीन वागणूक देत असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर केला होता. या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली होता. यानंतर लोकसभा अध्यक्षाच्या सेक्रटरीने या प्रकरणात २४ तासात अहवाल मागितला होता. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज (२६ एप्रिल) राणा दाम्पत्याचा पोलीस स्टेशनमधील एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या ट्वीटमध्ये राणा दाम्पत्या चहा पाणी पितानाचा व्हिडिओमध्ये दिसत आहे. मागसवर्गीय असल्यामुळे पाणी न दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. तुरुंगात आम्हाला हीन वागणूक मिळाल्याचा त्यांनी दिल्याचे म्हटले. या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांना तक्रार दाखल केली होती. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी २४ तासात यांचा अहवाल मागितील होता. 

राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसावरून झालेल्या नाेंट्यानंतर पोलिसांनी काल (२३ एप्रिल) अटक केले होते. राणा दाम्पत्याना वांद्रे न्यायालयाने काल (२४ एप्रिल) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार असून जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा कारागृहात तर रवी राणांचा आर्थर रोड कारागृहात मुक्काम असणार आहे. तातडीने जामीनावर सुनावणी घेण्यास वांद्रे न्यायालयाने नकार दिला आहे. आणि सरकारी पक्ष २७ एप्रिलला आमचे लेखी म्हणणे मांडण्याचा सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२७ जानेवारीपासून मुंबईत ‘नाइट लाइफ’, निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी

swarit

भाजप नेत्यांनो, जनाची नाही पण मनाची तरी ठेवा! धनंजय मुंडेंचा घणाघात

News Desk

मराठा आरक्षण | स्वत: प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात, मराठा मोर्चात होणार सहभागी

News Desk