HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात केलं तेच पुणे पिंपरी चिंचवडमध्ये करणार संजय राऊत!

पुणे। शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या होम ग्राऊंडवर पुण्यात जाऊन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. तसंच महाविकास आघाडी आहे. सगळ्यांना थोडं मिळालं पाहिजे. या न्यायाने पुणे आणि पिंपरीत सेनेचा महापौर झाला पाहिजे, अशी आमची इच्छा असेल तर चुकलं कुठे, असा सवालही त्यांनी विचारला.पिंपरी चिंचवडमध्ये आज संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी करताना आगामी काळातली सेनेची राजकीय महत्त्वकांक्षा बोलून दाखवली. त्यांनी अजित पवार यांच्या पुणे बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

पुण्याचा महापौर शिवसेनेचा असावा

राऊत म्हणाले, महापालिकेचे कुणाचे कितीही आकडे आले तरी महापौर आपलाच होईल… मी असं म्हणत नाही की आम्ही शंभर जागा जिंकू… पण मी मागे म्हटल्याप्रमाणे 55 जागा आल्या तरी आमचा मुख्यमंत्री होतो तर चाळीस-पंचेचाळीसला किमान पिंपरी-चिंचवडचा महापौर झाला पाहिजे, आमची अत्यंत माफक अपेक्षा आहे.महाविकासआघाडी आहे सगळ्यांना थोडा थोडा वाटा मिळाला पाहिजे तर त्यात आम्हालाही मिळाला पाहिजे. पिंपरी-चिंचवड शहराचा महापौर जर शिवसेनेचा असला पाहिजे, अशी जर आपण अपेक्षा केली तर त्यात चुकीचं काय? पुण्याच्या महापौर शिवसेनेचा असावा असं वाटतंय तर त्यात आपलं चुकलं काय?, असंही राऊत म्हणाले.

पुण्यावर कधी भगवा फडकवू शकलो नाही

पुणे जिल्ह्यात आपलं कोण ऐकत नाही असं काही जण सांगतात… मुख्यमंत्र्यांचे अजित पवार ऐकतात, त्यांना सांगू आमचे ही ऐका, नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत? मुख्यमंत्री हे दिल्लीचा अंदाज घ्याला गेलेत कारण दिल्ली वर आपल्याला राज्य करायचं आहे, असंही संजय राऊत म्हणाले. आपल्याला कुठल्याही पक्षाने गृहित धरु नये, असा त्यांच्या बोलण्याचा एकंदरित रोख असावा, अशी चर्चा आहे.इतकी वर्षे आपण या महाराष्ट्राच्या राजकारणात आहोत. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यातला… सातत्याने बाळासाहेब पुण्यात यायचे.. अनेक सभा घ्यायचे… अनेक माणसं त्यांनी जोडली… अनेकांना राजकारणात आणलं… शिवसेनेची ओळख कामातून झालेली आहे… पण एक खंत आहे की की आपण पिंपरी आणि पुण्यावर कधी भगवा फडकवू शकलो नाही, असंही राऊत म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात जीवनावश्यक वस्तूसह औषधांची कोणतीही टंचाई नाही, राज्य सरकारचे जनतेला आश्वस्त करणारे पत्रक

News Desk

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपारातून शिवसेनेने दिली उमेदवारी

News Desk

साखरेच्या गोडव्याने अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्यातील कटुता संपली? पाटील- पवार यांच्यात गुफ्तगु..

Arati More