HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्यांच्या चहा पितानाच्या व्हिडीओवर त्यांच्या वकिलांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई | मागासवर्गीय असल्यामुळे मुंबई पोलीस हीन वागणूक देत असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर केला होता. यासंदर्भात नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली होता. यानंतर बिर्लांचे सचिवांनी मुंबई पोलिसांना २४ तासात या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितला होता. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज (२६ एप्रिल) राणा दाम्पत्याचा पोलीस स्टेशनमधील एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या ट्वीटमध्ये राणा दाम्पत्या चहा पाणी पितानाचा व्हिडीओमध्ये दिसत आहे. यामुळे आता नवनीत राणा यांच्या आरोपात कितीपद खरे बोलत आहेत, यावर प्रश्न चिन्ह उभे राहत आहे. यानंतर राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या व्हिडीओला उत्तर देण्यासाठी त्यांनी देखील एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. 

वकील रिझवान मर्चंट म्हणाले, “मी माझ्या आशिलाच्या विनंतीनंतर हा व्हिडीओ बनवित आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी राणा दाम्पत्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. नवनीत राणा या पोलिसांच्या अटकेत मुलभूत सुविधा देखील मिळाल्या नसल्याची त्यांनी तक्रार केली होती. मी फक्त ऐवढेच सांगू इच्छितो की, खार पोलीस स्टेशनमध्ये त्यांना अटक केल्यानंतरचा हा व्हिडीओ पांडेंनी ट्वीट केला आहे. खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना चहा दिला होता. माझ्या आशिल हे रात्री १ वाजेपर्यंत खार पोलीस स्टेशनपर्यंत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये पाठवले होते. यानंतर माझे आशिलांची रात्र आणि न्यायालयात हजर करेपर्यंत त्या दोघांना सांताक्रूझमध्ये ठेवले होते. तेव्हा नवनीत राणांना हीन वागणूक दिली,” असे ते म्हणाले.

 

Related posts

निवडणुका होऊ द्या, मग…! धनंजय मुंडे-पंकजा मुंडे पुन्हा आमने-सामने

News Desk

भांड्याला भांड लागणारच, आम्ही समन्वयातून मार्ग काढू ! राऊतांच्या संतापानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

News Desk

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू; ‘या’ मुद्द्यांवर अधिवेशन जागण्याची शक्यता

Aprna