HW News Marathi
महाराष्ट्र

निवडणुका होऊ द्या, मग…! धनंजय मुंडे-पंकजा मुंडे पुन्हा आमने-सामने

बीड | “कशात किती खावं..हे भाजपच्या ताब्यातील नगरपालिकांना कळालं नाही. आता फक्त निवडणुका होऊ द्या. मग कारवाईला कमी पडायचं नाही”, असं म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी विरोधकांना दम भरला आहे. शनिवारी (१८ डिसेंबर) पाटोदा नगरपंचायतीच्या निवडणुकीतील जाहीर प्रचारसभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार अमरसिंह पंडित हे उपस्थित होते.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, “मराठा ओबीसी आरक्षण रद्द झालं त्याला महाविकासआघाडी जबाबदार असल्याचा आरोप भाजपवाले करत आहेत. मात्र पेट्रोल, डिझेल, गॅस महागला, महागाई गगनाला भिडली त्याला कोण जबाबदार? त्यावर विरोधक का बोलत नाहीत?”, असा सवाल धनंजय मुंडेंनी केला आहे. तसेच, “येत्या २१ तारखेला आष्टी- पाटोदा -शिरूरमधली घाण काढायची असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा”, असं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं आहे.

“ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी ५० कोटींच्या कामाच्या भूमीपूजनाला येऊ”, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडेंनी पाटोदाकरांना आश्वासित केलं आहे. दरम्यान, सध्या एकंदरच नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यात होऊ घातलेली नगरपंचायत ही काळी निवडणूक! – पंकजा मुंडे

दुसरीकडे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेही नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने चांगल्याच जोमाने तयारी करताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्यात होऊ घातलेली नगरपंचायत निवडणूक ही काळी निवडणूक असल्याचं विधान पंकजा मुंडेंनी केलं आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथे आयोजित जाहीर सभेत शनिवारी पंकजा मुंडे बोलत होत्या. यादरम्यान, महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या २६ जानेवारीपासून ‘महाराष्ट्र दौरा’ सुरु करणार असल्याचं देखील पंकजा मुंडेंनी जाहीर केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर का संतापले?, नारायण राणेंनी दिलं स्पष्टीकरण

News Desk

इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

News Desk

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर राऊत यांना देशद्रोही विचारच सुचणार – अतुल भातखळकर

News Desk