HW News Marathi
महाराष्ट्र

‘मला शरद पवारांना भेटायला आवडतं’, पवारांच्या भेटींबाबत राऊतांच भाष्य

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांच्याशी अनेक नेते, मंत्री गाठीभेठी घेत असल्याचं दिसून येत आहे. काल (२८ जून) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतलीय यावरुन तर्क वितर्क लावण्यास सुरुवात झाली. यावर आता राऊतांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीगाठींचे सत्र सध्या अधिक वाढले आहे.

काल राऊत पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक बंगल्यावर गेले. या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात तणाव वाढला असतानाच संजय राऊत हे गेल्या काही दिवसात सातत्याने पवारांच्या भेटीस जात असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी या भेटींबाबतच्या प्रश्नांना त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे. ‘उद्धव ठाकरे हे जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी ते शिवसेनेचे प्रमुख देखील आहेत. त्यामुळे मी भेटीला जातो. मी पवार साहेबांना गेली अनेक वर्षे भेटतोय. मला त्यांना भेटायला आवडतं. मला त्यांच्याशी बोलायला, विषय समजून घ्यायला आवडतं. त्यामुळे मी त्यांना भेटतो. मात्र प्रत्येक भेटीला राजकीय विषय आहे असा अर्थ काढणं चुकीचं आहे,’ असं सांगतानाच, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य उत्तम सुरु आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा महाविकास आघाडी सरकारला देखील फायदा होतोय.’ हे देखील त्यांनी आवर्जून नमूद केलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का? – प्रसाद लाड

News Desk

मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?- आशिष शेलार

News Desk

माझ्या विरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा !

News Desk