HW News Marathi
महाराष्ट्र

साताऱ्यातील २ खासदारांच्या निराळ्या तऱ्हा!

सातारा | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्याने महाराष्ट्रात लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीमध्येही साताऱ्यात मात्र दोन खासदारांच्या दोन तऱ्हा पाहायला मिळाल्या आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (१० एप्रिल) साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर आंदोलन करत होते.

मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील खासदार श्रीनिवास पाटील यांनी हा वेळ शेतीची कामे उरकण्यासाठी सत्कारणी लावल्याचे दिसून येत आहे. वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी आणि रविवारी लोकं श्रीनिवास पाटील यांना भेटायला येणार नाहीत. त्यामुळे श्रीनिवास पाटील यांनी स्वत:च्या शेतात गहू काढणीचे काम हाती घेतले. त्यानंतर साताऱ्यातील दोन खासदारांच्या दोन तऱ्हांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

श्रीनिवास पाटील यांनी शेतात केले काम

डोक्यावर पांढरी टोपी, पिळदार मिशी, अंगात पांढरा कुर्ता आणि जॅकेट असा पेहराव असलेले साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचं एक वेगळं आणि सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना आपलं वाटणारं रुप आज पाहायला मिळालं.विकेंड लॉकडाऊनमुळे मतदारसंघातील लोक आपल्या समस्या घेऊन येणार नाहीत. मग वेळ कुठे सत्कारणी लावायचा? असा प्रश्न त्यांच्या मनात आला. तेव्हा शेतात गहू काढायचं काम सुरु असल्याचं त्यांना समजलं आणि त्यांनी शेतात जात थेट गहू काढणीच्या कामात स्वत:ला गुंतवून घेतलं होतं.

काय म्हणाले उदयनराजे?

सरकारमधील कोणते तज्ज्ञ लॉकडाऊनचा निर्णय घेतात, असा सवालही त्यांनी विचारला. ते कुठल्याही दृष्टीकोनातून तज्ज्ञ वाटत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय समुदाय किंवा शास्त्रज्ञ लॉकडाऊनची गरज आहेच, असा अहवाल देत नाहीत, तोपर्यंत आम्ही लॉकडाऊन लागू देणार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे. यावेळी उदयनराजे भोसले यांनी पोलिसांना खुप सुनावले आहे. पोलिसांचा आदर करतो पण त्यांना हवं ते करण्य़ाचा अधिकार, लोकांना मारण्याचा अधिकार कोणी दिला असंही त्यांनी म्हटलं आहे. इतकचं नाही तर पोलिस म्हणजे मानलं तर देव नाहीतर दगड अशा भाषेत त्यांनी पोलिसांबद्दल वक्तव्य केले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक मान खाली घालून जगू शकत नाही | सोने व्यापाऱ्याची आत्महत्या

News Desk

सत्तारांनी राजीनामा दिला नाही!

swarit

नवाब मलिकांची प्रकृती खालावली, उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल

Aprna