HW News Marathi
महाराष्ट्र

ती गेली …आणि खासदार उदयनराजे भोसलेही हळहळले…

सातारा | ‘दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण’ झालेली महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती असलेल्या कोमल पवार-गोडसे हीचे आज दु:खद निधन झाले. “कोमल न्यू लाईफ फाउंडेशन” या संस्थेमार्फत कोमल आणि त्यांचे पती यांनी ऑर्गन डोनेशनसाठी खूप मोठं काम केलं,तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली.आज कोमलच्या जाण्याने फक्त तिच्या जवळचेचं नाही तर खासदार उदयनराजेसुद्धा भावूक झाले.त्यांना फेसबुक पोस्ट लिहीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये कोमलसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि लिहीलं आहे ,सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी.सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार – गोडसे हीला २०१७ साली “प्लमोनरी हायपरटेन्शन” या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले, पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ति मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली आणि कोमल ठरली होती

महाराष्ट्रातील पहिली “दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण” झालेली व्यक्ती. पण ३ दिवसापूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट केले, परंतु आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला.

कोमल आणि तिचे पती धिरज दोघांनी “कोमल न्यू लाईफ फाउंडेशन” या संस्थेची स्थापना केली होती, त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशन साठी खूप मोठं काम केलं तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली.स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, हसतमुख अश्या कोमल ला “सातारा” नेहमी स्मरणात ठेवेल. माझ्या अगदी लहान बहिणी प्रमाणे असलेल्या कोमल ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

खासदार उदयनराजे भोसले यांची फेसबुक पोस्ट

https://www.facebook.com/297806127025237/posts/1844129225726245/?extid=Cv1d7WJz8Il0OJQ9&d=n

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवसेनेत असताना गडकरींना माहित न्हवतं का?”, नाना पटोलेंचा गडकरींना सवाल

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु

News Desk

राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ | जयंत पाटील

News Desk