HW News Marathi
Covid-19

पिंपरी-चिंचवड मधील एका लघुउद्योजकास महावितरण विभागाकडून तब्बल ७९ कोटींचे बिल थोपवले

मुंबई | कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील लघुउद्योगांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. मात्र, आता महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे लघु उद्योजकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीने लघुउद्योजक बाबू जॉन यांना महावितरणने एक-दोन लाखांचे नव्हे तर तब्बल ७९ कोटी ७ लाखांचे बिल आकारले आहे. यात महावितरणने आकारलेले हे बिल २९ जूनपर्यंत भरायचे आहे. जर बिल नाही भरले तर बाबूंना आणखी एक कोटींचे बुर्दंड बसणार आहे. त्यामुळे बाबूंनी हातातील कामं बाजूला ठेवत पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडे धाव घेतली. संघटनेने महावितरण विभागाशी संपर्क साधून लॉकडाऊनमुळे तीन महिने मीटरचे रिडींग घेणे बंद होते, ते या महिन्यात घेण्यात यात गफलत झाली. असे कारण महावितरणने सांगितले.

बाबू जॉन यांचे भोसरी एमआयडीसीच्या सेक्टर १० मध्ये साई प्रोफाईल ही कंपनी आहे. बाबू यांच्या कंपनी प्लॅस्टिक मोल्डस आणि टूल्सची निर्मिती करतात. लुमॅक्स, वॅरॉक सारख्या कंपन्यांना ते पुरवठा करतात. गेल्या सहा वर्षापासून हा उद्योक करत आहे. गेल्या सहा वर्षापासून बाबू यांचे विज बिल हे जास्तीतजास्त दोन लाखांच्या घरात आले. त्यातच कोरोनाने शिरकाव केल्याने २२ मार्चपासून कंपनी बंद आहे. मीटर रिडींग घेणाऱ्या व्यक्तीकडून कोरोना फैलू शकतो, त्यामुळे रिडींग घेणे ही बंद होते. अशात साई प्रोफाईल कंपनीला मार्च महिन्याचे ८८ हजार १९७ रुपये तर एप्रिल महिण्याचे बिल अवघे ११ हजार ७३९ इतके वीजबिल आले.

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२ टक्के

News Desk

“मी मोदींना नेहमीच पत्रं लिहित असतो, पण कांगावाखोरांना उत्तर देत नाही”, फडणवीसांचे पटोलेंना प्रत्युत्तर

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ५४,७३६ नव्या कोरोना रुग्णांची भर

News Desk