HW News Marathi
महाराष्ट्र

धारावीत ४ नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या ४७ वर पोहोचली

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्याचा वेघ दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील मुंबईतील धारावीमध्ये आज (१३ एप्रिल) कोरोनाचे ४ नवे रुग्ण सापडले आहे. यामुळे धारावी हे कोरोना हॉटस्पॉट झाले आहे. या ४ जणांपैकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता कोरोना धारावीत रोनाग्रस्तांची संख्या ४७ वर पोहोचली असून मृतांचा आकडा ५ वर गेला आहे.

धारावीतील एका पुरुषाला आणि दोन महिलांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून यात एक महिला ही शुश्रूषा रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. तर सायन रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका ६० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सदर व्यक्ती धारावीच्या नेहरू चाळीमध्ये राहत होता. आणि इतर तीन रुग्ण इंदिरा नगर, जनता हौसिंग सोसायटी आणि गुलमोहर चाळीत राहतात. धारावीत सापडलेल्या कोरोना रुग्णामध्ये दोन महिलांचा सामवेश आहे.

कोरोना पॉझिटिव्ही आलेल्या सुश्रूषा रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या ३४ वर्षीय महिला या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त रुग्णांच्या कुटुंबीयांचे सँपल घेण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केले जाणार 

News Desk

निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी, आज दिग्गज नेत्यांच्या सभा

News Desk

गुलाब चक्रीवादळाचे ठाण्यात आगमन!

News Desk