मुंबई | माझगावातील जीएसटी भवनात भीषण आग लागली आहे. या जीएसटी इमारतीच्या ८ व्या आणि ९ व्या मजल्यावर लागल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारतीमध्ये आग लागलेल्या दोन्ही मजल्यावरील कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठक सोडून घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.
Mumbai: A level III fire has broken out in GST Bhavan, in Mazgaon area. More details awaited. pic.twitter.com/92fqpMF3tt
— ANI (@ANI) February 17, 2020
मुंबई अग्निशमन दलाला लेव्हव ३ चा हा कॉल दिला आहे, त्यामुळे आगीची तीव्रता मोठी असल्याचे कळते. ही आग इतकी भीषण असल्यामुळे माझगाव परीसरात धूराचे लोट पसरलेले आहेत. जीएसटी भवनात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आहेत. इमारतीत फर्निचर आणि लाकडी सामानही भरपूर आहे. मात्र, या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.