औरंगाबाद | पाटण्याहून मुंबईला जाणारे गो एअरच्या विमानाचे आज (२ जून) सायंकाळी अचानक औरंगाबादमधील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ लँडिंग झाले. विमानात १६५ प्रवासी असून तांत्रिक बिघाडामुळे विमान औरंगाबादेत उतरल्याची माहिती विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Mumbai bound GoAir flight made emergency landing in Aurangabad, today. Flight was flying from Patna to Mumbai. All passengers safe. #Maharashtra pic.twitter.com/qnlvuv5FQR
— ANI (@ANI) June 2, 2019
गो एअर विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानतळावर रुग्णवाहिकांचा ताफा दाखल झाला. विमानाची अचानक लँडिंग झाल्याने तात्काळ माहिती मिळातच पोलिसांचाही ताफा दाखल झाला होता. विमानाचे लँडिंग झाल्यानंतरही प्रवासी विमानातच बसून होते. ब-याच वेळेनंतर प्रवासी विमानातून बाहेर उतरले. विमानाची तांत्रिक तपासणी करून ते रवाना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.