HW News Marathi
महाराष्ट्र

मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

मुंबई | लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव झाल्यानंत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर काँग्रेसच्या अनेक राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी राजीनाम्याचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवरा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच मुंबई काँग्रेस अध्यक्षची धुरा सांभाळली होती. देवरा यांनी राजीनामा देण्यासोबतच काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे नेतृत्त्व करण्यासाठी तीन सदस्यीन समिती नेमावी असे देखील सुचवले आहे.

काँग्रेसमध्ये पुढील राष्ट्रीय भूमिका स्वीकारण्यासाठी देवरा दिल्ली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा राजीनाम्यासंदर्भातील एक पत्र नुकतेच देवरा यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे सुपुर्द केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेससाठी भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीच्या प्रभावाचा निषेध करणे हे काँग्रेससाठी एक मोठे आव्हान आहे, असे त्यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला दिल्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा

News Desk

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास तुम्हांला माहितीये का ?

News Desk

केंद्रात तुमचं काही चालत नाही की तिथं बोलायला घाबरता? – रोहित पवार

News Desk