HW News Marathi
महाराष्ट्र

बदली घोटाळा प्रकरणी फडणवीसांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात; भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नोटीसीची होळी

मुंबई | बदली घोटाळा प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र यांना नोटीस बजावण्यात आली आहे. फडणवीसांच्या मुंबई येथील सागर निवासस्थानी आज (१३ मार्च) ११ वाजता चौकशीसाठी येणार असल्याचे म्हटले होते. यानुसार, आज पोलीस फडणवीसांच्या निवासस्थानी त्यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे. फडवीसांना काल (१२ मार्च) पोलिसांनी नोटीस बजावली होती. फडणवीसांना नोटीस बजावल्याचे कळाल्यानंतर भाजपचे दिग्गज नेते त्यांचा निवसस्थानी जावून त्यांची विचारपूस केली. तर राज्यभरात महाविकासआघाडी सरकार विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली आहे. 

दरम्यान,  फडणवीसांना बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. परंतु, पोलीस फडणवीसांच्या निवासस्थानी येवून त्यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून पुण्याच्या महापालिकेच्या बाहेर महाविकासआघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर मुंबईत सुद्धा फडणवीसांच्या निवसस्थाना बाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी केली. फडणवीसांनी काल पत्रकार परिषद घेत म्हटले की, मी स्व:ता एक वकील आहे. आणि राज्याचा गृहमंत्री सुद्धा राहिलो आहे. त्यामुळे मी मुंबई पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करणार आहे. फडणवीसांच्या चौकशीतून कोणती माहिती पोलिसांला मिळेल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीसांच्या जबाब नोंदवण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी त्यांच्या बंगल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. फडणवीसांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर बंगल्याबाहेर हजर आहेत. भाजप कार्यकर्ते उद्या (१४ मार्च) शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हजर राहणार आहेत. आणि फडणवीसांना पाठवलेल्या नोटीसीची पुण्यात भाजप कार्यकर्ते होळी करणार असल्याची माहिती मिळाली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं”, शिवसेनेची जहरी टीका

News Desk

महावितरणला कर्जासाठी शासन हमी देण्यास मंजुरी

Aprna

सत्तेसाठी शिवसेनेने सगळी तत्वे गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली !

News Desk