HW News Marathi
देश / विदेश

मुंबई-गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रेंच नाव द्या,संभाजीराजे छत्रपतींची मागणी…

मुंबई | भाजपाचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाला स्वराज्याचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचं नाव देण्यात यावं अशा आशयाचं पत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबतचं त्यांनी केंद्रींय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देखील पाठवले आहे. शिवाय, आपल्या ट्विटरद्वारे त्यांनी याबाबत माहिती देखील दिली आहे.

संभाजीराजे यांनी या पत्रात लिहीले आहे की,

स्वराजाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात कान्होजी आंग्रे यांच्या योगदानाला तोड नाही. कान्होजींचा पराक्रम पाहून छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब बहाल केला. कान्होजी आंग्रेंनी औरंगजेबाच्या स्वारीच्या काळातच नव्हे तर पुढे 1729 पर्यंत मराठा सम्राज्याची अहर्निश सेवा करुन इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी या शत्रूंवर प्रचंड दहशत निर्माण केली. याचे शेकडो पुरावे इंग्रजांच्या आणि पोर्तुगीजांच्या दफ्तरात मिळतात. ते पाहिल्यानंतर कान्होजी आंग्रे यांच्याएवढा पराक्रमी आरमारी सेनानी अखिल हिंदुस्तानच्या इतिहासात झाला नाही. कोकणच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या तसेच हिंदुस्थानच्या आरमारी इतिहासाची पूर्तता कान्होजी आंग्रेशिवाय होऊ शकत नाही.

दिल्ली येथील नॉर्थ ब्लॉकमधील नौदल प्रमुखांच्या कार्यालयाच्या अगदी दारात सरखेल कान्होजी आंग्रे यांचे स्मारक आहे. कदाचित आजच्या नौदल प्रमुखांनी आपल्या आद्य नौदल प्रमुखाला सॅल्यूट करुनच कार्यालयात प्रवेश करावा, अशी संकल्पना असेल. अशा स्वराज्यनिष्ठ महान विराची दखल परिवहन मंत्री म्हणून घ्याल आणि मुंबई-गोवा महामार्गाला सरखेल कान्होजी आग्रे यांचे नाव द्याल, असा विश्वास आहे”, असं संभाजीराजे पत्रात म्हणाले आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोग म्हणतं माध्यमांना थांबवा, सर्वोच्च न्यायालय म्हणतं जमणार नाही!

News Desk

विकास दुबेचे २ साथीदार अटकेत, दया नायक यांनी केली कारवाई

News Desk

रोहीत वेमुला दलित नव्हेच!

News Desk