HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबै बँक बोगस मजूर घोटाळ्याप्रकरणी प्रविण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

मुंबई | मुंबै बँक बोगस मजूर घोटाळ्याप्रकरणी भाजप नेता प्रविण दरेकर यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला आहे. मुंबै बँक बोगस मजूर घोटाळा प्रकरणी दरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करून दिलासा मिळाला आहे. दरेकरांना कस्टडीची गरज नाही, असे न्यायालयाने आज (१२ एप्रिल) पार पडलेल्या सुनावणीत म्हटले आहे. न्यायालयाने दरेकरांना ५० हजाराच्या जातमुचूलक्यावर जामीन यापूर्वी पोलिसांनी दोन वेळा दरेकरांची चौकशी केली होती. दरेकरांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे  सूडबुद्धीने महाविकासआघाडी सरकारकडून करण्यात आलेली कारवाई आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 

दरेकरांवर जो एफआयआर नोंदविण्यात आला त्या काही तथ्य नाही. ही एफआयआर राजकीय हेतू प्रेरित केस केली. फक्त दरेकरांना अडकवण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप दरेकरांचे वकील अखिलेश चौबे यांनी केला आहे. चौबे पुढे म्हणाले, ” असून हे न्यायालयाने मान्य आणि दरेकरांना अजकपूर्व जामीन अर्ज दिला आहे. 

मुंबै बँकच्या निवडणुकीच्या वेळी दरेकरांनी प्रतिज्ञा या मजूर सहकारी संस्थेत साल १९९७ मध्ये सभासद होतो. आणि दरेकरांनी २० वर्षे मजूर असल्याचे खोटे भासवत मुंबै बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. यादरम्यान दरेकरांनी आर्थिक अफरातफर करण्यात आले. २०१५ मध्ये ‘नाबार्ड’चा प्रत्येक अहवालात मुंबै बँके घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. २०१३मध्ये ८९ अ अंतर्गत केलेल्या चौकशीत संचालक मंडळाने मुंबै बँकेच्या ठेवीदारांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले असून यात कारवाई करण्याची मागणी केली होती.

Related posts

करुणा शर्मां यांच्या जामिनाचे काय झाले? काय आहे न्यायालयाचा निर्णय?

News Desk

शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी, गुणरत्न सदावर्तेंसह 115 ST कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर

Aprna

“येणाऱ्या 4 दिवसांत 4 ठिकाणी राज्याच्या नेत्यांची प्रकरणं बाहेर येणार”, किरीट सोमय्यांचा नवा दावा

News Desk