HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत अद्याप लोकल सुरू होणार नाहीत, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (११ ऑक्टोबर) फेसबूक लाईव्ह माध्यमातून संवाद साधला. ऑफिसला जाण्यासाठी मुंबईतील लोकल ट्रेन सुरु होणार का, याकडे डोळे लावून बसणाऱ्या चाकरमान्यांची रविवारी साफ निराशा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्तास लोकल ट्रेन सुरु न करण्याचे संकेत दिले आहेत. सर्वांनाच लोकल हवी आहे, पण मला गर्दी नको. त्यामुळे सध्या आपण लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार आहोत. ही संख्या वाढल्यावर त्यात आणखी लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

त्यामुळे १५ ऑक्टोबरनंतर मुंबईतील लोकल ट्रेन सुरु होणार असल्याच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवा आणि मोजक्या सरकारी कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. परिणामी सामान्य लोकांना कार्यालय गाठण्यासाठी रस्ते वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, यामुळे रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण येताना दिसत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे लोकल ट्रेन लवकरात लवकर सुरु व्हाव्यात, अशी मागणी सामान्य लोकांकडून सातत्याने केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात आजपासून सवर्ण आरक्षण लागू

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १६९ मतांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर

News Desk

छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांवर लादण्यात आलेल्या अवाजवी, अनाठायी निवडणूक खर्चाच्या निर्णयाला स्थगिती द्या!

Aprna