HW News Marathi
महाराष्ट्र

सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही – गुलाबराव पाटील

जळगाव | भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे भाजप सोडून इतर पक्षात जाणार का अशा चर्चा सुरू होत्या आणि अजूनही आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात खडसेंच्या पक्षांतराचे संकेत देणारी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण, मुंबईत खडसेंची राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवारांसोबत भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत ४ दिवस थांबून असताना खडसे आणि शरद पवार यांच्यात कोणत्याही प्रकारची भेट झाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला बळी, तर सात वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह

News Desk

5 ते 6 दिवसात शाळा कॉलेज संदर्भात निर्णय, आरोग्यमंत्र्यांची माहिती!

News Desk

‘मुंबई, महाराष्ट्रानं अनेक लोकांना धनवान केलंय’, राऊतांचा विरोधकांना टोला

News Desk