HW News Marathi
महाराष्ट्र

महापरिनिर्वाण दिनी गर्दी न करण्याचे नागरिकांना महापौरांकडून आवाहन

मुंबई | सध्या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा देशासह राज्यात निर्बंध लादण्यात आले आहे. यामुळे ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनावर कोरोनाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकर यांनी आज (२ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन महापरिनिर्वाण दिना गर्दी न करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. महापौरांनी आज महापरिनिर्वाण दिनानिमत्ताने बैठक बोलविली होती. या बैठकीनंतर महापौरांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

दरम्यान, “मुंबईच्या चौत्यभूमीवर लांबून येणाऱ्या लोकांना दर्शनात प्राधान्य देण्यात येणार असून मुंबईतील लोकांनी शक्यतो ऑनलाईन दर्शन घ्यावे,” असे आवाहन महापौरांनी नागरिकांना केले आहे. कोरोना नियमाचे पालन करणने बंधनकारक करणे असल्याचे महापौरांनी सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नव्या व्हेरियंटमुळे नागरिकांनी गर्दी करू नये, सर्व नियमांचे पालन करावे, अशा सूचना महापौरांनी नागरिकांना सांगितल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर विशेष उपायोजना करणार आहेत. तसेच चैत्याभूमीवर किटकनाशकांची फवारणी करण्यात येणार आहेत. चैत्यभूमीवर येणाऱ्या सर्वांना दर्शन घेणार असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू!

News Desk

मी कायद्याची एजंट; कायद्यानेच काम करते : किरण बेदी

News Desk

पृथ्वीराज साठे यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बढती

News Desk