HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार, BMC चा निर्णय

मुंबई | कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ‘ओमीक्रॉन’च्या भीतीमुळे देशासह राज्यात सर्तक राहण्याचे आवाहन सरकारकडून केले आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पालिका क्षेत्रातील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचा निर्णय आज (३० नोव्हेंबर) पालिकेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आठवड्या भरापूर्वी राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीच्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने मागे होता. मात्र, आता पालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. यानंतर आयुक्तांच्या परवागीनंतर शाळा १५ डिसेंबरला सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पुण्यात देखील शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर गेला आहे. पुणे पालिका क्षेत्रातील १५ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय आज पालिका आयुक्त आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पालिकेच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तर नाशिक पालिका क्षेत्रातील शाळा १० डिसेंबरनंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करून शाळा सुरू करणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

राज्य शाळा सुरू करण्याचा निर्णय

राज्यात २५ नोव्हेंबरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेतून दिली होती. यावेळी ग्रामीण भागात पहिली ते चौथी सुरू होणार होत्या. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवी ते बारावी वर्ग सुरू झाल्या होत्या. तसेच शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यास चाईल्ड टास्क फोर्सने परवानगी दिल्याची माहिती गायकवाडांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपिनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला एक स्वप्न पूर्ण, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे मंजूर!

News Desk

रवी राणा 22 एप्रिलला ‘मातोश्री’ समोर हनुमान चालिसा पठण करणार

Aprna

महिलांच्या लोकल प्रवासावर भाजपा गप्प का? नवरात्रीत मायभगिनींना लाभ झाला नसता का?रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईच्या महिलांना उत्तर द्या.

News Desk