मुंबई । मुंबईतील घाटकोपर पश्चिम परिसरातील एका खासगी सोसायटीच्या परिसरात उभी असलेली एक कार पाण्यात बुडत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, सदर व्हिडिओतील घटना आज (१३ जून) सकाळी घाटकोपर पश्चिम परिसरात घडलेली आहे.
धक्कादायक ! जमीन खचल्याने काहीच सेकंदात कार थेट जमिनीत. मुंबईतील घाटकोपर परिसरातील घटना #HWNewsMarathi #MumbaiRains pic.twitter.com/F02kNz88Bx
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) June 13, 2021
मुंबई महानगरपालिकेकडून याबाबतचे स्पष्टीकरण देताना असे सांगण्यात आले की, “सदर सोसायटीच्या आवारात एक विहिर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर ‘आरसीसी’ करून ती विहीर झाकण्यात आली होती. त्या ‘आरसीसी’ केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी ‘कार पार्क’ करीत असत. हाच ‘आरसीसी’ चा भाग खचून त्यावर ‘पार्क’ केलेली एक कार पाण्यात बुडाली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, तसेच कोणीही जखमी झालेले नाही.”
या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याच्या कामाचे समन्वयन करण्यात येत आहे. तसेच सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाय योजना तातडीने करण्यास संबंधित सोसायटीला सूचित करण्यात आले आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी / कर्मचारी देखील सदर घटनास्थळी हजर आहेत, असेही मनपाने सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.