मुंबई। क्रूझ पार्टी, आर्य़न खान आणि राष्ट्रवादीचे आरोप यामुळे सध्या गाजत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो सध्या चर्चेत आहे. अशातच एनसीबीला कोंडित टाकणारे एक प्रकरण समोर आले आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या एनसीबीचा अधिक्षक दिनेश चव्हाण याला परळी रेल्वे पोलिसांनी महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणी अटक केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून या अधिक्षकाविरोधात प्रवासादरम्यान विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची छेड काढून तिच्यासोबत विकृत चाळे केल्याचा आरोप एनसीबीचा अधिक्षक दिनेश चव्हाण विरोधात आहे. या अधिकाऱ्याला कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती जीआरपी औरंगाबादचे पोलिस अधिक्षक एम पाटील यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
Maharashtra | Parli railway police arrests a Mumbai NCB officer in alleged molestation of a woman in a train. The NCB officer was travelling from Hyderabad to Pune. Case has been registered against the accused & he'll be produced before court shortly: M Patil, SP GRP Aurangabad
— ANI (@ANI) October 8, 2021
अंतर्वस्त्रासोबत विकृत चाळे केल्याचा आरोप
कंट्रोल ब्युरो च्या अधिक्षक असलेले दिनेश चव्हाण हे न्यायालयीन कामासाठी हैद्राबाद येथे गेले होते. हैद्राबाद पुणे अशा परतीच्या रेल्वे प्रवासादरम्यान त्याने २५ वर्षीय प्रवासी महिलेचा विनयभंग केला. महिलेचा विनयभंग करत अंतर्वस्त्रासोबत विकृत चाळे केल्याचा आरोप दिनेश चव्हाणवर करण्यात आला आहे. त्यामुळेच परळी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दिनेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्याला कोर्टात हजर केले
दिनेश चव्हाण हे मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे, व त्यांच्यावर मानसिक आजारावर उपचार सुरू असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. या २५ वर्षीय प्रवासी महिलेनी प्रवासा दरम्यान छेड काढल्याच्या प्रकरणाची तक्रार केली होती. आपल्या अंतर्वस्त्रासोबत विकृत चाळे केल्याप्रकरणी तिने एनसीबीचे अधिक्षक दिनेश चव्हाण विरोधात तक्रार केली होती. या महिलेच्या तक्रारीनंतरच परळी पोलिसांनी दिनेश चव्हाणला अटक केली आहे. या अधिकाऱ्याला कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती जीआरपी औरंगाबादचे पोलिस अधिक्षक एम पाटील यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.