HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही, शरद पवारांना तात्काळ अटक करा!

मुंबई। शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाचे नियम नाहीत का? असा सवाल ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. इतकंच नाही तर शरद पवारांना अटक करा, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा सदावर्ते यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिला आहे.पुणे जिल्ह्यातील मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते.

शरद पवार यांना अटक करा, नाहीतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करु

या गर्दीवरुन गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शरद पवार यांना अटक करण्याची मागणी केली आहे. “शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी कोव्हिड नियम नाही का? राजकारणासाठी लोकांना एकत्र आणणे, लोकांना वेठीस धरणे हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 ला अभिप्रेत नाही. शरद पवार, दिलीप वळसे पाटील तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता मला तुम्हाला सांगायचं आहे, शरद पवार यांना अटक करा, नाहीतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करु आणि आम्ही तशी तक्रार केली आहे” असं सदावर्ते म्हणाले.

संभाजीराजे मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “खासदार संभाजीराजे मराठा युवकांचे पुढारी असू शकतात. परंतू ते राज्यपाल, मंत्री यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत. संभाजीराजेंनी आपल्या समर्थकांना त्यांची मर्यादा समजावून सांगितली पाहिजे होती. मात्र, तसं झालेलं दिसलं नाही. मुळात सारथी सारख्या जातीय व्यवस्थेतून 1000 धनदांडग्यांसाठी पैशाचा असा अपव्यय करणं योग्य नाही. यांना गरज नाही, त्यामुळे त्यावर पैसे खर्च करु नये.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी अल्टिमेटम नको, मराठा संघटनांना सोबत घेत भूमिका मांडण्याची गरज! – राधाकृष्ण विखे-पाटील

News Desk

मुंबई विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा पॅटर्न ठरला! 

News Desk

चांदणी चौक परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या मार्गिकेचे काम त्वरित करण्याचा निर्णय

Aprna