HW News Marathi
महाराष्ट्र

‘महिला सुरक्षितेसाठी पोलीस आयुक्तांच्या 12 मोठ्या सूचना’ !

मुंबई | मुंबईला हादरवणारी घटना साकीनाका इलाक्यात घडली आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती देण्यासाठी आतापर्यंत दोनवेळा पत्रकार परिषद घेतली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीकडील हत्यारे देखील जप्त केले आहेत. या बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशाप्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

काय सूचना आहेत?

1) साकीनाका येथील घटनेच्या वेळी पोलिसांच्या प्रतिसादाचे वेळ दहा मिनिटे होता. अशा घटनांमध्ये नियंत्रण कक्षाची भूमिका फार महत्त्वाची असते. महिला संदर्भात आलेल्या कॉलकडे दुर्लक्ष करु नये. त्याची तात्काळ दखल घेऊन त्याबाबत कार्यवाही करावी.

2) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंधाराची ठिकाण, निर्जन आदी ठिकाण याचा पोलिसांनी आढावा घ्यावा. त्या ठिकाणी बीट मार्शल त्याचप्रमाणे पेट्रोलिंग मोबाईल यांची गस्त वाढवावी.

3) अंधाराच्या, निर्जन स्थळी लाईटची व्यवस्था करावी. त्यासाठी महानगरपालिका सोबत पत्रव्यवहार करावा. संबंधीत यंत्रणेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत पाठपुरावा करावा.

4) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंधाराची ठिकाण, निर्जन स्थळे या ठिकाणी क्यू आर कोड लावावा जेणेकरुन गस्तीवरील वहाने, गस्त करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा वावर होऊन अनुचित प्रकार टाळता येईल.

5) पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्या ठिकाणी सार्वजनिक महिला शौचालय आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकांमार्फत पुरेशी लाईट दुरुस्त करुन घ्यावी तसेच त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक पाच यांची गस्त वाढवावी

6) रात्रीच्या गस्ती दरम्यान एखादा संशियत आढळल्यास पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करावी. आवश्यकता असल्यास कायदेशीर कारवाई करावी.

7) रात्रीच्या वेळी एखादी महिला एकटी आढळून आल्यास रात्रीची गस्त घालणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिची विचारपूस करुन त्यांना तात्काळ योग्य ती मदत द्यावी. खरंच गरज भासल्यास सदर महिला सुरक्षित दृष्टीने सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी.

8) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंमली पदार्थाची नशा करणारे, ड्रग्स जवळ बाळगणारे यांच्यावर कारवाई करावी.

9) पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावर बेवारसरित्या बराच काळापासून कमी असलेले टेम्पो टॅक्सी ट्रक आणि इतर गाड्या याची दखल घ्यावी त्या गाड्यांच्या मालकाचा शोध घेऊन ती वाहने त्यांना तेथून काढल्यास सांगावे ती वाणी तसेच बेवारस आढळल्यास ती ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करावी.

10) महिलांबाबत प्रामुख्याने 354, 363, 376, 509 आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातात. या कायद्या अंतर्गत अटक असलेल्या आरोपींची यादी तयार करण्यात यावी. या यादिस सेक्सयुअल ओफेडर लिस्ट म्हणून संबोधून या यादितील आरोपींवर योग्य ती कारवाई करावी.

11) ज्या पोलीस स्टेशन च्या हद्दीत मोठी रेल्वे स्टेशन आहेत, बाहेर गावच्या गाड्या येतात, त्या स्टेशनच्या बाहेर एक मोबाईल व्हॅन रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ठेवावी. बाहेर गावावरुन येणाऱ्या एकट्या महिलेस योग्य ती मदत करावी. त्या महिलेस तिच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करुन द्यावी. आणि त्या गाडीचा क्रमांक, ड्रायव्हरचा मोबाईल लिहून घ्यावा. त्यानंतर फोन करुन ती महिला व्यवस्थित पोहचली की नाही, याची चौकशी करावी.

12) रात्रीच्या वेळी गस्तीवरील अधिकाऱ्यांनी त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरात भेट देऊन, तिथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दखल घ्यावी, असं आदेशात म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई शेअर बाजारातही मराठी टक्का वाढतोय – सुभाष देसाई

Aprna

“मी समाधान आवताडे शपथ घेतो की..”,पंढरपूरच्या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ

News Desk

गडकिल्ले लग्न, सभारंभांसाठी भाड्यावर देणार नाही, पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण

News Desk