HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट

मुंबई | मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेटी घेतली आहेत. गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर  मुंबई पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. गृहमंत्र्यासोत झालेल्या भेटीदरम्यान, राज्यातील भाजप नेते किरीट सोमय्या हल्ला प्रकरण आणि आमदार रवी आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा दाम्पत्य या दोघांनी मुंबई पोलीस आणि संजय पांडेंच्यावर आरोप होत आहे. या भेटीमध्ये राज्यातील सध्याच्या परिस्थिती आणि मुंबई पोलिसांवर झालेले आरोप या मुद्यांवर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

यापूर्वी सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्याप्रकरणी सीआयएसएफने मुंबई पोलिसांना जाब विचारला होता. यानंतर सोमय्यांवर हल्ला झाला तेव्हा सीआयएसएफचे जवान कुठे होते, याची चौकशी करा, असे पत्र आयुक्तांनी सीआयएसएफच्या महासंचालकांना लिहिल्याची माहिती मिळाली आहे. सोमय्यांना केंद्राकडून झेड सिक्युरिटी देण्यात आली आहे. ही सिक्युरिटी हल्ल्या प्रकरणी नेमकी कुठे होती, असा सवाल पांडेंनी पत्रातून विचारला आहे. 

नेमके काय आहे प्रकरण

राणा दाम्पत्याना हनुमान चालिसा प्रकरणी २३ एप्रिलला पोलिसांनी अटक केले होते. राणा दाम्पत्याना भेटण्यासाठी सोमय्या हे खार पोलीस स्टेशनला गेले होते. सोमय्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येण्यापूर्वी पोलिसांना आपण येणार असल्याची माहिती दिली होती. जेव्हा सोमय्यांची गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. तेव्हा सोमय्यांच्या गाडीवर चप्पल आणि दगडफेक झाली असून यात सोमय्या जखमी झाले होते. मी पोलीस स्टेशनला रात्री साडे नऊच्या सुमारास येणार असल्याचे कळावले होते. मी पोलीस स्टेशनला येण्याआधीच ७० ते ८० शिवसैनिकांनी खार पोलीस स्टेशनच्या आवारात आणि दराजवळ जमले होते. माझी गाडी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर शिवीगाळ करण्यात आली. आणि माझी गाडी थांबवण्याचाही प्रयत्न केला असून मी परत जात असताना तरही माझ्यावर हल्ला झाला. मी जबाबदारी म्हणून पोलिसांना सांगितले. परंतु ते म्हटले की आम्ही सगळी व्यवस्था केली असून पोलीस स्थानकाचे दार उघडताच बाहेर असलेले ७० ते ८० गुंडांच्या हवाले माझी गाडी दिली. हे सर्व पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केले. यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक..!

News Desk

जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

मालपाणी कमवण्याकरता ‘हे’ सर्व लोक एकत्र आले आहेत !

News Desk