HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली 

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत आलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर ) विभागात बदली करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले आहे. त्यांच्या बदलीच्या वृत्ताला सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे यांनी दुजोरा दिला आहे. शुक्रवारी ते पदभार स्वीकारतील अशीही माहिती समोर येत आहे.

सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांची आता कोणत्या विभागात बदली होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवलं जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचं कारण काय, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार शिवाजी कर्डिलेच्या पोलीस कोठडीत वाढ

News Desk

अनेकांना वाटत होते, मी निवृत्त होईल पण तसे घडले नाही !

swarit

“राणेंना सूक्ष्म उद्योग मंत्री करा किंवा थेट पंतप्रधान करा; शिवसेनेला काही दुःख नाही”

News Desk