HW News Marathi
महाराष्ट्र

कॉंग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई | राज्यात सध्या राजकीय नेत्यांवर अनेक प्रकारचे गंभीर आरोप केले जात आहेत. राष्ट्रवादी, शिवसेनेनंतर आता कॉंग्रेसचा नंबर लागला आहे.काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनीत वाघमारे यांना पोलिसांनी केली अटक केली आहे. सुनीत वाघमारे यांच्यावर महिलेचा बलात्कार, फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे यांच्यावर मुंबईच्या भोईवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा लोणावळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सुनीत वाघमारेंचा काँग्रेसशी काहीही संबंध नाहीदरम्यान, राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यबर खळबळ उडाली आहे. सुनीत वाघमारे यांच्या अटकेची काँग्रेसने दखल घेतली आहे. सुनीत यांच्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलंय. याबाबतचे ट्विट काँग्रेचे नेते सचिन सावंत यांनी केले आहे.“काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचे बंधू सुनीत वाघमारे संदर्भात भाजप फार चिंतन करीत असल्याचे समजते. मात्र, सुनीत यांचा काँग्रेसशी कोणताही संबंध नाही. २०१७ साली मुंबई मनपा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे सुनीत त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे.” असे सचिन सावंत यांना आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, सामानातून जोरदार टीका

News Desk

पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला राहणार उपस्थित

News Desk

मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही !

News Desk